नियंत्रण आणि विश्वास
नियंत्रणाच्या हेतूबद्दलची शिक्षकाची कल्पना काय, यावर बरेच काही अवलंबून असते. नियंत्रणाची गरजच नसल्याचे लक्षात आणून देणे हाच त्याचा अंतिम हेतू असेल; मुलांनी ठाम, समर्थ, जबाबदार बनावे असे शिक्षकाला वाटत असेल आणि ती तशी बनू शकतात असा त्याला विश्वास असेल, तर शिकण्याला मुलांनी नकार देण्याचा असा धोका खूपच कमी होईल याची मला खात्री आहे. शिक्षक मुलांची …